हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol Export) जगात मोठी मागणी आहे. भारतीय मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोल ड्रिंकला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानुसार, येत्या काही वर्षात आपली निर्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8,000 कोटी रुपये) पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.
2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मद्यविक्री होईल – Alcohol Export
मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत, प्रमुख परदेशी डेस्टिनेशन मध्ये भारतीय मद्याची निर्यात वाढविण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. याबाबत APEDA ने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील काही वर्षांत निर्यात महसूल एक अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. 2023-24 मध्ये देशातुन 2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मद्यविक्री होईल. भारतातून अरब इमिरात, नेदरलँड्स, केनिया, सिंगापूर, टांझानिया, अंगोला, रवांडा यांसारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त मद्य निर्यात (Alcohol Export) केली गेली. एपीईडीएने सांगितले की, डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड) ब्रिटनमध्ये गोदावन सुरू करण्यास तयार आहे. ही राजस्थानमध्ये बनवलेली सिंगल-माल्ट व्हिस्की आहे.
इंडियन ब्रेव्हर्स असोसिएशनचे महासंचालक विनोद गिरी म्हणाले की, या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. उच्च-गुणवत्तेची व्हिस्की उत्पादक म्हणून भारताची प्रतिष्ठा निर्माण करण्यात सिंगल-माल्ट व्हिस्की मोठी भूमिका बजावेल, परंतु प्रीमियम इंडियन व्हिस्कीसारख्या चव आणि किमतीच्या दृष्टीने अधिक रुचकर असलेल्या पेयांना अधिक मागणी असेल अशी अपेक्षा आहे. अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमध्ये निर्यातीची प्रचंड क्षमता आहे. राज्य उत्पादन शुल्क धोरणांमध्ये निर्यात प्रोत्साहनांचा समावेश करण्यासाठी राज्यांना आग्रह करण्याची सूचना त्यांनी सरकारला केली.