ट्रोलिंग ला कंटाळून आलिया, करीना आणि करण ने नेटकऱ्यांसाठी कमेंट बॉक्स केला बंद 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मध्ये युद्ध सुरु झाले आहे. घराणेशाही, एकाधिकारशाही यावर खुलेपणाने काही अभिनेते बोलत आहेत. सोशल मीडियावर या युद्धाने चांगलाच वे पकडला आहे. सलमान खान सोबत शाहरुख खान, शाहिद कपूर, आलिया भट, करण जोहर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. बरेच व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. या ट्रोलिंग ला कंटाळून आता आलिया भट, करण जोहर, करीना कपूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरील कमेंट बॉक्स हा सामान्य युजर्स साठी बंद केला आहे.

एका वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे. बऱ्याच चाहत्यांनी या स्टार किड्सना फॉलो करणं बंद केलं आहे. सलमान खान, करण जोहर आणि आलिया भट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तसेच यांचे फॉलोवर्स देखील वेगाने कमी होत आहेत. नुकतेच सोनाक्षी सिन्हाने आपले ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट केले आहे. आता या स्टार किड्सनी देखील आपला कमेंट बॉक्स बंद केला आहे.

केवळ स्टार किड्सनाच यांच्या पोस्टवर कमेंट करता येणार आहे. ज्यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे,  यांचा समावेश आहे. यापूर्वी सोनम कपूरने आपला कमेंट बॉक्स सामान्य नेटकऱ्यांसाठी बंद केला होता. आता नेटकऱ्यांना या स्टार किड्सच्या कोणत्याच पोस्टवर कमेंट करता येणार नाही आहे.