Aliens : धक्कादायक खुलासा !!! या ग्रहांवर असू शकते एलियन्सचे अस्तित्व

Alien
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aliens : जगभरातील शास्त्रज्ञांकडून सतत एलियन्सच्या अस्तित्वाचा शोध घेतला जात असतो. अनेक शास्त्रज्ञांना असे वाटते कि, एलियन्स कोणत्याही एका ग्रहावर असू शकतील. अमेरिकेतील कोपनहेगन विद्यापीठाने नुकतेच याबाबत संशोधन देखील केले होते. यावेळी शास्त्रज्ञांना बायनरी स्टार्सभोवती फिरणारे ग्रह एलियन्ससाठी संभाव्य घर असू शकतील असे आढळून आले.

बायनरी स्टार्स म्हणजे काय ?

बायनरी स्टार्स हे दोन स्टार्सची एक अशी सिस्टीम आहे जी गुरुत्वाकर्षणाने बांधली गेली आहे. हे स्टार्स एकमेकांभोवती फिरत राहतात. जर याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले तर हे बायनरी स्टार्स एकसारखेच दिसतात. या संशोधनामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, सूर्यासारखा आकार असलेले सुमारे अर्धे स्टार्स हे बायनरी आहेत. Aliens

Alien Life Could Be Hiding Out on Far Fewer Planets Than We Thought | Live  Science

एलियन्सच्या शोधात मदत

या संशोधनात असेही म्हटले गेले आहे की बायनरी स्टार्सच्या सभोवतालच्या ग्रहांची सिस्टीम सिंगल स्टार्सभोवती असलेल्या ग्रहांच्या सिस्टीम पेक्षा खूप वेगळी असू शकेल. म्हणजेच एलियन्सच्या शोधात असे ग्रह नवीन टार्गेट ठरू शकतील. पृथ्वीवरील जीवनाची शक्यता आणि व्याप्ती लोकांना आकर्षित करते. खगोलशास्त्रज्ञ आता हे समजून घेण्यासाठी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत की, ज्यांचा जन्म पृथ्वीवर झालेला नाही असे जीवन पृथ्वीच्या बाहेर देखील अस्तित्वात असेल का ??? Aliens

Are aliens real? Do aliens exist? Technosignatures may hold new clues :  NewsCenter

या ग्रहांची व्यवस्था वेगळी आहे

या संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की या संशोधनाच्या निकालांवरून हे दिसून येते की सूर्यासारख्या सिंगल स्टार्सभोवती असलेली ग्रहांची सिस्टीम ही बायनरी स्टार्सच्या सिस्टीम पेक्षा खूप वेगळी असते. या प्रोजेक्टचे नेतृत्व करत असलेले कोपनहेगन विद्यापीठातील नील्स बोहर इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक जेस ख्रिश्चन जॉर्गेनसेन म्हणाले की,” हा निकाल रोमांचक करणारा आहे, कारण पुढील काही वर्षांमध्ये परकीय जीवनाचा शोध अनेक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली साधनांसह करता येईल.” Aliens

Will we know alien life when we see it? | Science News for Students

तैवान आणि अमेरिकेचाही सहभाग

जॉर्गेनसेन पुढे म्हणाले की,”या संशोधनामुळे विविध प्रकारच्या स्टार्सभोवती ग्रह कसे तयार होतात हे समजण्यास मदत होईल. हे निकाल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झाले आहेत. तैवान आणि अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञही या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत.

aliens Archives - Universe Today

नवीन बायनरी स्टार्स आढळून आला

चिलीमध्‍ये ALMA टेलीस्कोपद्वारे पृथ्वीपासून सुमारे 1,000 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका तरुण बायनरी स्टार्सचा शोध लागला आहे. हा बायनरी स्टार् (NGC 1333-IRAS2A) वायू आणि धुळीच्या डिस्कने वेढला गेलेला आहे.

हे पण वाचा :

Porn : … आणि वयाच्या 83 व्या वर्षी तो बनला चक्क पॉर्न स्टार !!!

David Miller : धडाकेबाज खेळी करत गुजरातला अंतिम पोहोचविणाऱ्या मिलरने मागितली RR ची माफी

Honda कडून लवकरच लॉन्च केली जाणार दुसरी हायब्रिड कार !!! नवीन फीचर्सविषयी जाणून घ्या

RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!