३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा आणि नियुक्त्या तातडीने भराव्या अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आल्या नंतर राज्य सरकारने याबाबत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

३१ जुलै पर्यंत सरकार एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. त्याचबरोबर मला या राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे कि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि सगळी भरती तातडीने करण्यासाठी आग्रही असताना सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिल्याने न्यायव्यवस्थेचा आदेश सर्वाना मान्य करावा लागतो आणि तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका राज्य सरकारची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं

ते पुढे म्हणाले, स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबद सरकार सकारात्मक भूमिका घेईल तसेच सरकार कोणाचेही असलं तरी अशी घटना घडत काम नये असेही अजित पवार यांनी म्हंटल . आम्हीदेखील लोणकर कुटुंबियांच्या दुखत सहभागी असून पुन्हा राज्यातील कोणत्याही मुलावर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी सरकार नक्कीच घेईन अशी खात्री अजित पवार यांनी दिली

Leave a Comment