शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; कोणाला कोणता बंगला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे -फडणवीस सरकारने आपल्या मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप केलं आहे. सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. मागील सरकार मधील काही माजी मंत्र्यांनी आपले बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

पहा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला –

राहुल नार्वेकर- शिवगिरी
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी
चंद्रकांत पाटील- लोहगड
विजयकुमार गावित- चित्रकूट
गिरीश महाजन- सेवासदन
गुलाबराव पाटील- जेतवन
संजय राठोड- शिवनेरी
सुरेश खाडे- ज्ञानेश्वरी
उदय सामंत- मुक्तागिरी
शंभूराज देसाई- पावनगड
दीपक केसरकर- रामटेक
मंगलप्रभात लोढा- विजयदुर्ग
रवींद्र चव्हाण- रायगड
अतुल सावे- शिवगड
अब्दुल सत्तार – पन्हाळगड

दरम्यान, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील प्रत्येकी ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. पुढील महिन्यात अजून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून कोणाला संधी मिळणार हे पाहायला हवं. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.