औरंगाबाद | कोरोनामुळे शहरातील औषधी दुकानांचा व्यवसायही तेजीत चालला आहे. लॉकडाऊन असो वा नसो औषधी दुकाने सुरूच असतात. यामुळे फार्मसी झालेल्या युवकांनी आपली औषधी दुकाने सुरू केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आधी शहरात २,२०० औषधी दुकाने होती, त्यात मागील वर्षभरात ७० नवीन औषधी दुकानांची भर पडली आहे.
संघटनेचे विनोद लोहाडे यांनी सांगितले की, दरवषी २०० विद्यार्थी फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र, सर्वच विद्यार्थी व्यवसाय सुरू करत नाही; परंतु गेल्या वर्षभरात स्वतःचा औषधी व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या अधिक होती.
उठाव कमी; पण दुकाने वाढताहेत…
सोने-चांदीच्या भावात मागील वर्षभरात अस्थिरता असताना व उठाव कमी असतानाही शहरातील काही भागांत दागिन्यांचे नवीन दालने सुरू झाली आहेत. सुमारे ३० पेक्षा अधिक नवीन दालने उघडली आहेत. यात जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, उस्मानपुरा आदी भागांत ही दुकाने मागील तीन महिन्यांत उघडली आहेत.
शहराच्या आसपासच्या गावांतील ज्वेलर्सनी शहरात आपली दालने सुरू केल्याचे सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा