संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ?? ; युपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच युपीएच अध्यक्ष व्हावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. दरम्यान राऊतांच्या या मागणीवरून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. अस म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली.

हुसेन दलवाई म्हणाले, ” संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, अशी खरमरीत प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like