अंबादास दानवे शिंदे गटाच्या वाटेवर? थेट मातोश्रीवरून मनधरणीचे प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटात नाराज असून येत्या २-३ दिवसात ते शिंदे गटात जाऊ शकतात. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांचं तिकीट जवळपास निश्चित झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे थेट मातोश्रीवरून दानवे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबतच वृत्त ‘लोकमत’ ने दिले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) अनेक मातब्बर नेतेमंडळी शिंदे गटात गेली असली तरी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. ठाकरेंनी अंबादास दानवेंनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा दिले, मात्र अंबादास दानवे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते. महाविकास आघाडीत संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित आहे, परंतु चंद्रकांत खैरेंना लोकसभेचे तिकीट मिळू शकते, त्यामुळे दानवे नाराज आहेत. दानवे यांची नाराजी लक्षात घेत त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तसेच तुमची प्रचारासाठी राज्यात गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघेही दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक- दोन दिवसांत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच संजय शिरसाट यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यामुळे तो बडा नेता म्हणजे अंबादास दानवे तरी नाहीत ना?? असा प्रश्न निर्माण झालाय. दानवे जर शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरेंची हा सर्वात मोठा धक्का ठरेल.