Saturday, March 25, 2023

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर घणाघात; दिल्लीच्या समोर पाय चाटायला…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह गोठवल्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला त्यांनी लगावल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाडा दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.

अंबादास दानवे हे 2 दिवसीय अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांची मान आधीच खाली गेलेली आहे. ज्या शिवसेनेचे बोट धरून भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढला त्याच शिवसेनेच्या मुळावर ते उठले आहेत. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही असे जोरदार प्रत्युत्तर देत दानवेंनी फडणवीसांवर घणाघात केला.

- Advertisement -

दरम्यान, शिंदे गटातील आमदार आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी सचिवाला शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला होता याबाबत विचारलं असता अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे, ते कुठेही गेले तरी असेच वागणार, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.