नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, अंबाझरी पोलिसांकडून आरोपीला अटक

Sexual harassment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करण्यात आले आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. निलेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अत्याचार (Sexual harassment) आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेशने तरुणीशी ओळख करुन तिला आपल्याकडे नोकरी असल्याचे सांगितले. तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचे आहे सांगून भेटायला बोलावले आणि भंडारा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual harassment) केला. त्यानंतर घरी नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार (Sexual harassment) केला. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी देत तिला बसस्टँडवर सोडून दिले. यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाणे गाठून आरोपी निलेश विरुद्ध तक्रार दाखल केली.

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार
अंबाझरी येथे राहणारी 24 वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी या ठिकाणी आली होती. दोघी बहिणी मोर भवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी नीलेशने त्यांचे बोलणे ऐकले आणि आपल्याकडे नोकरी असल्याचे आमिष त्याने दाखवले. स्वत:ची ओळख हॉटेल मालक अशी करून दिली. यानंतर आरोपीने पीडित तरुणीकडून फोन नंबर घेतला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोन करून गणेशपेठ बसस्थानकावर बोलावले. तरुणी तेथे आल्यानंतर आरोपीने तिला सांगितले की, एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिज म्हणून जॉब आहे, त्याच्या मुलाखतीसाठी जायचे आहे. मग त्यानंतर तरुणीला भंडारा येथे घेऊन गेला आणि तेथे त्याने पीडित तरुणीवर जबरदस्ती (Sexual harassment) केली.

अंबाझरी पोलिसांकडून आरोपीला अटक
यानंतर आरोपी निलेशने पीडित तरुणीला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual harassment) केला. रात्रभर ओलिस ठेवल्यानंतर आरोपीने तरुणीला गणेशपेठ बस स्टँडजवळ सोडून दिले. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन असे धमकावत त्या ठिकाणाहून निघून गेला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या बहणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु करून आरोपी निलेशला अटक केली.

हे पण वाचा :
‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!!

कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!