नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका गोळीबाराच्या (shooting) घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अल्बामामधील वेस्टाविया हिल्स सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये काल संध्याकाळी काही लोकांकडून अंधाधुंद गोळीबार (shooting) करण्यात आला. या प्रकरणात अमेरिकन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वेस्ताविया हिल्स पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी 3775 क्रॉसहेव ड्राइव्ह भागात गोळीबार (shooting) झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. येथील चर्चमधील अनेकांना गोळी लागली आहे.
या गोळीबारात (shooting) एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या गोळीबारात (shooting) नेमके किती जण जखमी झाले आहेत हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
4 महिन्यांत 212 घटना
अमेरिकेतील स्वतंत्र डेटा संग्रह करणाऱ्या ‘गन व्हॉयलन्स अर्काइव्ह’च्या रिपोर्टनुसार गेल्या 4 महिन्यात 212 सामूहिक गोळीबाराच्या (shooting) घटना समोर आल्या आहेत. 2021 मध्ये 693 सामूहिक गोळीबाराच्या (shooting) घटना घडल्या होत्या. 2022 मध्ये आत्तापर्यंत 611 ठिकाणी गोळीबार (shooting) झाला आहे. तर 2019 मध्ये 417 ठिकाणी या प्रकराच्या घटना घडल्या होत्या.
हे पण वाचा :
धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?
EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या
IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!
Axis-ICICI बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती