अमेरिकेचा भारताला नकार, म्हणाले,”मुंबई हल्ल्यातील दोषी हेडलीला सोपवणार नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या डेव्हिड हेडलीला अमेरिका भारतात पाठवणार नाही. त्याच वेळी, या हल्ल्याचा आणखी एक मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा यांच्या प्रत्यार्पणाची शक्यता आहे. राणाच्या पुन्हा झालेल्या अटकेनंतर अमेरिकेच्या अटॉर्नी यांनी कोर्टाला सांगितले की हेडली अमेरिकेच्या तुरूंगात 35 वर्षांची शिक्षा भोगत आहे.

राणा याला भारताच्या आदेशानुसार अटक केली
डेव्हिड कोलमन हेडली याचा बालपणिचा मित्र राणा याला 10 जून रोजी लॉस एंजेलिस येथे भारताच्या विनंतीनुसार पुन्हा अटक करण्यात आली. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सामील झाल्याबद्दल राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताने अमेरिकेकडे केली होती. राणाला भारतात फरारी घोषित केले आहे. राणा याच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल.

मुंबई हल्ल्याचा कट
फेडरल प्रॉक्यूटर्सच्या म्हणण्यानुसार 2006 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान राणाने दाऊद गिलानी उर्फ ​​हेडलीबरोबर हल्ला करण्याचा कट रचला होता. या दोन्ही दहशतवाद्यांनी लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी यांना मुंबईतील हल्ले घडवून आणण्यासाठी आणि कट करण्यास मदत केली. आम्ह अमेरिकेचा नागरिक असलेला डेव्हिड हेडली लष्करचा अतिरेकी आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात तो अधिकृत साक्षीदार झाला आहे. हल्ल्याच्या सहभागासाठी तो अमेरिकेत 35 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे अमेरिकेने हेडलीच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे.

राणाच्या प्रत्यार्पणावर सुनावणी
राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने अजूनही भारताची विनंती दाखल केलेली नाही, तरीही लवकरच ते तसे स्पष्ट करतील. मात्र हे स्पष्ट आहे की राणा याच्यावर इलिनॉय कोर्टात ज्या आरोपांवर खटला चालला होता ते आरोप आणि भारताच्या तक्रारीत केलेले आरोप हे वेगळे असतील. सह-षड्यंत्र करणार्‍या हेडलीचे प्रत्यार्पण न करण्याचा अमेरिकेचा निर्णय हा विसंगत आहे आणि त्यामुळे अमेरिका त्याचेही प्रत्यार्पण रोखले आहे, असे राणाने आपल्या बचावामध्ये म्हटले आहे.

यामुळे अमेरिका हेडलीला देणार नाही
सहाय्यक यूएस अ‍ॅटर्नी जे. लॉजियन यांनी शुक्रवारी लॉस एंजेलिसच्या फेडरल कोर्टात सांगितले की राणाप्रमाणे हेडलीने हल्ल्यांमध्ये असलेला आपला सहभाग ताबडतोब मान्य केला होता आणि सर्व आरोपांवर आपण दोषी असल्याचेही त्याने कबूल केले होते. म्हणूनच ते म्हणाले की, हेडलीला भारतात प्रत्यार्पण केले जाणार नाही. राणाने कोणताही आरोप मान्य केला नाही तसेच अमेरिकेस सहकार्यही केलेले नाही म्हणूनच परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणून, हेडलीला देण्यात आलेले फायदे त्याला मिळू शकत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.