हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन सध्या जगाच्या निशाण्यावर आहे. जगभरात हा विषाणू चीनने पसरवला असल्याचे बोलले जात आहे. भारत चीन सीमेच्या तणावातही अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर वाढते आहे असे म्हंटले जाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनविरोधात मोठी कारवाई करणार असल्याचे म्हंटले जाते आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रेस सेक्रेटरी कायली मैकनेनी (Kayleigh McEnany) यांनी गुरुवारी सांगितले की, ‘चीन वर होणाऱ्या कारवाई संदर्भात मी राष्ट्राध्यक्षांच्या आधी काहीच सांगू शकत नाही, पण लवकरच या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळेल. आमच्या पुढच्या पावलांविषयी तुम्हांला वाट पाहावी लागेल. ट्रम्प यांनी १५ दिवसांत चीनविरोधात ९ महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) ओ ब्रिन यांनी बुधवारी सांगितले होते की चीनने हॉंगकॉंग मध्ये नवीन सुरक्षा कायदे लागू करून त्यावर झडप घातली आहे. ही या दशकातील सर्वात मोठी घटना आहे. याशिवाय चीन तेथील स्वतंत्र लोकांवर आपली मर्जी थोपवत आहे. शिवाय फेडरल इन्वेस्टिगेशन ब्यूरो (एफबीआई) चे डायरेक्टर क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की चीन अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यांनी मंगळवारी वॉशिंगटन च्या हडसन इंस्टीट्यूट च्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते.