व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अमित शाह मुंबईत; गणेश दर्शन आणि नेत्यांच्या भेटीगाठीसह भरगच्च कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत. गणेशोत्सवानिमित्त ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल झाले असले तरी त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे – फडणवीस सरकार आणि महत्त्वाचे म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणूक यामुळे अमित शहांच्या मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

कसा असेल महित शाह यांचा मुंबई दौरा-

सकाळी 9 वाजता : अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.
सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील.
सकाळी 10.30 वाजता : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील.
सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.
सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील
दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन इथंच होईल.
दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.
दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.
दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.
संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीला जाणार

अमित शहांच्या दौऱ्याला महत्त्व का ?

अमित शाह हे खरं तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आलॆ आहेत. परंतु मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय खलबते होणार हे निश्चित. भाजपने अलीकडेच आपलं मिशन मुंबई जाहीर केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर मुंबई महापालिकेवर बसवायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. त्यातच शिंदे गटामुळे भाजपची ताकद वाढली असून उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भाजपशी जवळीक अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे भाजप , शिंदे गट आणि मनसे एकत्रितपणे लढून उद्धव ठाकरेंना धक्का देणार का ? यासंदर्भात राजकीय खलबते होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.