नवी दिल्ली | राज्याचे सत्तासमिकरण जुळवण्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची धूळधाण झाली आहे. राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीचे नेते सैरभैर झाले आहे. याच पार्श्वभूमिवर आघाडीतील दिग्गज नेत्यांनी कॉंग्रेसचा हात आणि मनगटावरचं घड्याळ सोडून कमळ हाती घेणं अधिक पसंत केलं आहे.
कमळाच्या दिशेने वाढणारे हात थांबता थांबत नाहीये. आघाडीचे सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नाही तेव्हा सत्ताधारी पक्षातून उमेदवारी मिळवायची आणि आपली राजकीय प्रतिष्ठा कायम ठेवण्याच्या मनसुब्याखातर दिग्गज नेते भाजपत गेले आहे आणि काही जाण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी आयारामांच्या या मनसुब्यावर भाजपाच्या चाणक्यांची करडी नजर आहे. एव्हाना गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना तशा सुचनादेखील केल्या आहेत.
भाजपमध्ये आजवर आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारीविषयी कोणतेही आश्वासने देऊ नका अशा सक्त सूचना, मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अवघ्या काही ठवड्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने विरोधीपक्षातून भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू आहे. परंतू विधानसभा निवडणूक उमेदवारी कोणाल द्यायची यासाठी भाजपाने अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. लोकांमधूनच आलेल्या प्रतिक्रियानुसार भाजप उमेदवार ठरवणार असून या सर्वेक्षणानुसार राज्यातील नेत्यांनी कुणालाही उमेदवारीची हामी देऊ नये असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहेत.