सत्तेसाठी उद्धव ठाकरे पवारांच्या पायाशी जाऊन बसले; शहांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्तेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पवारांच्या (Sharad Pawar) पायाशी जाऊन बसले. मात्र आज खरी शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा धनुष्यबाण घेऊन भाजपसोबत आली आहे. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी टीका केली आहे. कोल्हापूर येथील भाजपच्या विजय संकल्प यात्रा सभेमध्ये अमित शाह बोलत होते.

अमित शाह म्हणाले, सत्तेसाठी उद्धव ठाकरे जाऊन शरद पवारांच्या पायाशी बसले. सत्तेसाठी आम्ही तत्त्वांचा त्याग केला नाही, सत्तेचा लालसाही आम्हाला नाही. आपल्या मनात महाराष्ट्राचे सर्वोपरिहित आहे असं अमित शाह यांनी म्हंटल. कुटील बुद्धिमत्तेने क्षणभर राजकारण आणि सत्ता बळकावता येते, पण लढाईत केवळ धैर्य, शौर्य आणि निकाल उपयोगी पडतात, जो उद्धव यांच्या शिवसेनेकडे नाही. ते भाजप कार्यकर्त्यांकडे आहे असेही अमित शाह म्हणाले.

यावेळी अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.आगामी २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रपणे लढणार आहे अशी घोषणा अमित शाह यांनी केली. जे बाकी उरले सुरले आहेत ते महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि प्रकाश आंबेडकर भाजप आणि शिवसेना युतीविरोधात लढतील अशी खिल्लीही त्यांनी उडवली.