अजून किती वर्षांपर्यंत राहणार भाजप युग?; अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सत्ता स्थापन केली आहे. तर वरती केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार व भाजपचे युग किती दिवस अजून राहणार? असे प्रश्न पडत असताना भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. “अजून पुढील 30 ते 40वर्षे तरी भाजपचा काळ असणार आहे. आणि या भाजपच्याच काळात भारत देश विश्व गुरु बनेल, असे शाह यांनी म्हंटले आहे.

भाजप पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज हैद्राबादमध्ये बैठक पार पडली. यावेळी या मंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशात अजून भाजप किती काळ टिकेल अशी चर्चा होत आहे. अजून पुढील 30 ते 40 वर्षांचा काळ हा भाजपचा असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल.

या देशाच्या राजकारणासाठी सर्वात मोठा शाप लागला आहे. तो म्हणजे घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा होय. जो देशासमोरील समस्यांना खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरत आहे. ज्या ज्या राज्यात कौटुंबिक राजवट असणार आहे. त्या त्या ठिकाणी भाजपकडून ती संपवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

देशात खास करून तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कौटुंबिक राजवट असलेली पहायला मिळत आहे. त्या ठिकाणीही भाजपकडून आता लक्ष दिले जाणार असून तेथेही कौटूंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शाह यांनी म्हंटले.

Leave a Comment