बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मिळणार आता ‘या’ दर्जाची सुरक्षा

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयामुळे बॉलीवूडचे महानायक बनलेले शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.

यापूर्वी अमिताभ बच्चन यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. सरकारच्या वतीने सध्या मोठ्या कलाकारांच्या सुरक्षेत वाढ केली जात आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र सरकाराने सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे काल मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

सलमान नंतर आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय आज पोलिस प्रशासनाने घेतला. यापूर्वी अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. एक्स दर्जाच्या सुरक्षेत तीन सुरक्षा अधिकारी शिफ्ट्समध्ये काम करतात.