शतकांचा आवाज हरपला; लतादीदींच्या निधनाने ‘बिग बी’ हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शतकांचा आवाज हरपला अशा शब्दांत बॉलीवूड चे महानायक अमिताभ बच्चन यांनी हळहळ व्यक्त केली.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित लता मंगेशकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे,”शतकांचा आवाज हरपला, आता स्वर्गातही लतादिदींचा आवाज रुंजी घालेल”. दिदींच्या जाण्याने मला अतिव दु:ख होतंय. त्या आज आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत असे अमिताभ बच्चन यांनी म्हंटल.

गेली 90 वर्ष त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांची सेवा केली. त्या दिदी आज आपल्यात नाहीत. आता त्यांचा अवीट सूर स्वर्गातही रुंजी घालेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशी प्रार्थना आफल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी केलीय.