अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर लग्न करणार? Insta पोस्टने खळबळ

AMOL KOLHE AMRUTA KHANVILKAR
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारे अनेक चाहते आहेत. मात्र काल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चाना उधाण आलं. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे लवकरच लग्न करणार अशी बातमी छापलेली एक पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट बघून सर्वच चकित होत आहेत. परंतु यामागील नेमकी स्टोरी काय आहे ते पाहूया..

काय आहे अमोल कोल्हे यांची पोस्ट –

अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला. या अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर लग्न करणार आहेत अशी ती बातमी होती. डॉ. अमोल कोल्हे हे सध्या बायकोला कंटाळले आहेत. त्यामुळे ते चंद्रा फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात आहेत. लवकर ते बायकोला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर सुद्धा तिच्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असे चित्रपट क्षेत्रात बोलले जात आहेत. ‘या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मीपण उपमुख्यमंत्री होऊ शकेन, कारण अमृता हे नावच लकी आहे अशी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती.

https://www.instagram.com/p/Cqf5Fz1pGmP/?utm_source=ig_embed&ig_rid=a04c2036-f79b-4d17-9bc4-3ca8619604e3

या बातमीचे कात्रण अमोल कोल्हे यांनी शेअर केलं.’हा कोणता पेपर आहे, ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’ असं कॅप्शन कोल्हे यांनी लिहिलं. अमोल कोल्हे यांची ही पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. अमृता खानविलकरने देखील ‘हे काय आहे’, अशी कमेंट अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर केली आहे.