फडणवीसांच्या हनुमान चालीसेत चुका; राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात दाखल व्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यात हनुमान चालीसा म्हणतं राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी स्वत: हनुमान चालिसा म्हणून दाखवली. मात्र, त्यांच्या हनुमान चालीसेतील चूक राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिट करी यांनी काढली आहे. तसेच ट्विट करीत ”आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत करून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पुर्ण पाठ करून घ्यावा, असा सल्लाही दिला आहे.

मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काल देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत म्हंटलेल्या हनुमान चाळीसे वरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत करून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पुर्ण पाठ करून घ्यावा, ही विनंती, असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

फडणवीस काय म्हणाले,

राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. पण, या बैठकीवर भाजपानं बहिष्कार टाकला आणि याबाबत पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पक्षाची भूमिका मांडली. सरकार जर हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल आणि त्यांना हवं तेच करत असेल तर या बैठकीला उपस्थित राहून काय उपयोग? त्यामुळे अशा सरकारसोबत संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं फडणवीस म्हणाले.