व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा ; सदाभाऊंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या एकमेकांवर टीका करताना नेतेमंडळींना आपण काय बोलतोय याचेही भान राहत नाही. टीका करताना त्यांचा तोलही सुटत आहे. याचा प्रत्यय आला असून शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी घातल्याचे खोत यांनी म्हंटले आहे.

सांगली येथे सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिटकरींबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. यावेळी मिटकरींवर टीका करताना खोत म्हणाले की, “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे. राष्ट्रवादीच्या नाच्याला फार गांभीर्याने घ्यावे, असे मला वाटत नाही. राष्ट्रवादी या पक्षाची संस्कृती आहे, जातीभेद वाढवा, जातीजातीत तणाव निर्माण करा. वेगवेगळ्या समाजामध्ये दुही निर्माण करुन त्यांना फोडा, झोडा ही राष्ट्रवादीची निती जुनी आहे.”

राज्यामध्ये जातीयवादाला खतपाणी हे खऱ्या अर्थाने कोणी घातले असेल तर ते पवार साहेबांनी घातले आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक जातीचा नेता तयार केला आहे. ज्याने त्याने आपापली जात सांभाळायची, त्याच्या बदल्यात कितीही भ्रष्टाचार करायचा. तुम्हाला आमदार करतो, खासदार करतो, मंत्री करतो पण त्याच्या बदल्यात तुम्ही तुमची जात सांभाळा आणि पवारसाहेब कसे तारणहार आहेत, एवढंच त्या जातीमध्ये जाऊन सांगा… गेली ४० वर्ष या महाराष्ट्रात हाच धंदा सुरु आहे, अशी टीका खोत यांनी केली आहे.