व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गणपतीला विद्युत रोषणाई करताना 8 वर्षीय चिमुकलीचा शाॅक लागून मृत्यू

कराड | गणेशोत्सवासाठी विद्युत रोषणाईचे काम सुरू असताना सवादे (ता. कराड) परिसरातील नाईकवाडी येथे विजेचा शॉक लागून आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. अर्पिता प्रकाश शेवाळे असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.

सवादे येथे आपल्या घरगुती गणरायापुढेही आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करताना अर्पिता हिला शाॅक लागल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर ऐन सणाच्या काळात शोककळा पसरली आहे. अर्पिताला विजेचा धक्का बसल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांच्यासह हवालदार राजे व त्यांचे सहकारी करत आहेत. अर्पिताच्या मृत्यूने शेवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.