Satara News : शर्यत सुरु होताच भरकटलेल्या बैलगाड्याच्या धडकेत वृध्द ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी गेलेल्या शौकिनांवर बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडा अंगावर येण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. तर काहींचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरताव येथील यात्रेत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमधील बैलगाडीची धडक बसून दाजी गणपती काळेल (वय 62, रा. वळई, ता. माण) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मन तालुक्यातील शिरताव येथील ग्रामदैवताची यात्रा सुरू असून या यात्रेनिमित्त शनिवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी दाजी काळेल हे वळई येथून संतोष या मुलासमवेत मोटारसायकलवरून शनिवारी दुपारी शिरताव येथील यात्रेस आले होते. यावेळी चाकोरीचा शेवट असतो तेथे दाजी काळेल उभे राहिले होते. बैलगाडा शर्यत पाहत असताना दाजी काळेल यांना शर्यतीमधील भरकटलेल्या गाड्याच्या बैलाची धडक बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. ही घटना लक्षात येताच संयोजक, तसेच शर्यत पाहण्यासाठी आलेले त्यांच्याकडे धावून गेले.

जखमी अवस्थेत त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथे नेत असताना वाटतेच त्यांचा मृत्यू झाला. म्हसवड येथील डाॅक्टरांनी तपासणी केली असता अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.