लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केल्याच्या रागातून मैत्रिणीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

0
57
Mobile Check
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राचे लग्न झाल्यावर त्याने आपल्यासोबत बोलणे बंद केल्याचा राग आल्याने तरुणीने असे काही कृत्य केले कि ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. हि घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीवर कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण
घनसावंगी येथील एका मुलीचे 10 जानेवारी 2021 रोजी लग्न झाले. लग्नानंतर पीडित मुलीच्या पतीकडे असलेल्या मोबाइलवर बनावट इंस्टाग्राम अकाऊंट्सवरून अश्लील मेसेजेस येऊ लागले. या महिलेच्या नावाने अश्लील चॅट आणि मेसेजेस येऊ लागले. यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्या पतीच्या नावावर अश्लील भाषेत मेसेज टाकून बदनामी करण्यात येत असल्याचे पीडित महिलेने म्हंटले आहे. यानंतर पोलिसांनी तपास केला असता बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे मेसेज करण्यात येत असल्याचे सायबर पोलिसांच्या लक्षात आले.

यानंतर पोलिसांनी या बनावट अकाऊंट्सची माहिती काढल्यानंतर एका मुलीने हे अकाऊंट बनवल्याचे समोर आले. यानंतर या मुलीची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर या मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या महिलेने सांगितले कि लग्नानंतर या मुलाने माझ्यासोबत बोलणे बंद केल्याचा राग आल्याने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करुन इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here