मुंबई । पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना समर्थन पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यावर सरकाराने याला विदेशी दुष्प्रचार म्हणत निंदा केली. यानंतर काही भारतीय सेलिब्रिटींनी सुरात सूर मिसळत ट्विट केले होते. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, विराट कोहली, सायना नेहवाल यांचा समावेश होता.
दरम्यान, सुनील शेट्टीने ट्विट करताना मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता. सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.