हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा वरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायला नको होता, ती चूक झाली अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. त्यांचा राजीनामा घ्यायला नको होता. निर्णय घाईघाईनं झाला असं मला वाटतं. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भविष्यात शिवसेना आणि भाजप कधीच एकत्र येणार नाहीत असेही संजय राऊत यांनी म्हंटल. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांनी 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणं शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.