हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्या अली आहे. तसेच 6 नोव्हेंबर पर्यंत विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांची कोठडी वाढविली असून त्यांच्या 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ केली आहे.
ईडीच्या वतीने अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. दरम्यान ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली आहे. दरम्यान ईडीने सत्र न्यायालयाच्या निर्णया विरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना पुन्हा ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने त्यांना काल कोर्टात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.