भाजपच्या पराभवासाठी अनिल गोटेंनी घेतली पवारांची भेट…

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | धुळ्यातील भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल २६ वर्षांनी भेट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे.

अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. धुळे मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे. मला यासाठी ज्यांची मदत घ्यायची आहे त्यांची मदत घेणार, असं अनिल गोटे यांनी पवारांच्या भेटींनतर सांगितलं.

या भेटीनंतर पवार यांनी अनिल गोटे यांना सांगितले की, धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे, आम्ही आघाडीधर्म मोडणार नाही. मात्र या विषयी धुळ्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह बोलून कळवू असे सांगितले.

 

इतर महत्वाचे – 

नागपूरमध्ये एमआयएम की भारिप ??

” टॉक विथ कलेक्टर ” ला तरुणाईचा उदंड प्रतिसाद..