हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यात आज जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. कारण त्यांच्यावर साेलापूरात एका प्रकरणात आजच गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना काेल्हापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सदावर्ते यांनी एसटी पैसे घेतल्याची कबुलीही दिली आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी घेतलेल्या भूमिकेवरून आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “सदावर्ते यांनी पगार नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याकडूनही पैसे घेतले आहेत. तसेच त्यांना लुटले आहे,” अशी टीका परब यांनी केली आहे
मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी सदावर्ते याच्या अटकेनंतर एसटी कामगार कामावर हजर होऊ लागले असल्याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील एसटी कर्मचारी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू झाले तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर रुजू होत असल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच एसटी वाहतूक सुरळीत होईल.
इतके कर्मचारी झाले कामावर हजर
राज्यात आतापर्यंत 79 हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.आज जवळपास 79 हजार 82 एसटी कर्मचारी कालपर्यंत कामावर हजर होते. एकूण 82 हजार 108 कर्मचाऱ्यांची संख्या आहे. आज उद्या आणि परवा अजून 3 दिवस आहेत. या तीन दिवसांमध्ये कामावर कर्मचारी कामावर हजर होतील, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.