भुकेने व्याकुळ झालेला सिंह शिरला चक्क शाळेत; पुढे झालं असं काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु आहे.अशा परिस्थितीत लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, वन्य प्राण्यांच्या शहरात दाखल होण्याच्या घटनाही देशातील विविध रस्त्यावर दिसून आलेल्या आहेत.असाच एक व्हिडिओ आता गुजरात मधून समोर आला आहे.ज्यामध्ये एक भुकेलेला सिंह अन्नाच्या शोधात एका प्राथमिक शाळेत प्रवेश करताना दिसला.त्याने शाळेत प्रवेश केल्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

गुजरातचे आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत ही घटना गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील उना गावची असल्याची माहिती दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शाळेशेजारी असलेल्या पाळीव प्राण्यांच्या घेरात अन्नाचा शोध घेण्यासाठी सिंह आला होता. पण शेताच्या मालकाने त्याला पाहटाच आरडाओरडा केला.यानंतर सिंह पळून गेला आणि शेजारी असलेल्या शाळेत आसरा घेतला.

सिंहाचा शाळेत प्रवेश झाल्याची माहिती कळताच ग्रामस्थही एकत्र झाले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सिंहाला पकडण्यासाठी मोहीम राबविली. सिंह पळून जाऊ नये म्हणून संघाने सर्व जाण्याचे मार्ग बंद केले.एकीकडे त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी मोठा पिंजरा ठेवला पण सिंह त्यातूनही सुटला. यानंतर या पथकाने त्याला बेशुद्ध केले आणि त्याला पिंजऱ्यात ठेवले. यानंतर त्याला जसधर अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथून त्याला जंगलात सोडण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.