हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । App : जेव्हा आपला मोबाइल चोरीला जातो त्यावेळी तेव्हा तो सापडणे अशक्य असते. कारण एकदा फोन चोरल्यानंतर चोरटे तो मोबाइल बंद करून ठेवतात. ज्यामुळे तो ट्रॅक करया येत नाही. मात्र, तो ट्रॅक कसा करावा यावरील उत्तर आता सापडले आहे. कारण Google Play Store वर एक असे App उपलब्ध आहे जे आपला फोन स्विच ऑफ केल्यानंतरही त्याचे लोकेशन पाठवते. यामुळे आपला चोरीला गेलेला फोन सापडण्याची शक्यता आता बळावली आहे.
Google Play Store वर उपलब्ध असलेल्या या App चे नाव Track it EVEN if it is off असे आहे. जे Hammer Security या कंपनीकडून डेव्हलप करण्यात आले आहे. हे ऍप आपल्याला Google Play Store वरून अगदी सहजपणे डाउनलोड करता येईल. हे ऍप वापरण्यासही खूप सोपे आहे.
फोन App स्विच ऑफ केल्यानंतरही काम करेल
आपल्या फोनमध्ये या App इन्स्टॉल करण्यासाठी फक्त हे ऍप उघडावे लागेल आणि काही परवानग्या द्याव्या लागतील. तसेच या ऍप मध्ये डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोड सारखे फीचर्सही आहेत. हे जाणून घ्या कि, आपला फोन बंद केल्यानंतरही हे ऍप काम करत राहते, त्यामुळे जर मोबाइल चोरीला गेला आणि फोन बंद केला तरीही हे ऍप फोनचे लोकेशन पाठवेल.
चोरट्यांच्या हालचालींवर असेल
आता आपला फोन जर चोरीला गेला किंवा कोणाच्या हाताला लागला. आपल्या इमर्जन्सी नंबरवर त्याच्या सर्व हालचाली, त्याच्या सेल्फी आणि इतर डिटेल्स मिळत राहतील. या ऍप द्वारे आपला मोबाईल सहजपणे ट्रॅक केला जातो. जर आपण अँड्रॉईड फोन वापरत असाल तर हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये सहजपणे इन्स्टॉल करता येऊ शकेल. यामुळे जर आपला फोन चोरीला गेला तर त्याची माहिती किंवा फोनचे लोकेशन मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://play.google.com/store/apps/details?id=com.hammersecurity&hl=en_IN&gl=US
हे पण वाचा :
5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे, अशा प्रकारे तपासा स्टेट्स !!!
ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!
गेल्या 5 वर्षात Best Agrolife च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 6,900 टक्के रिटर्न !!!
ATM मधून पैसे काढण्यासाठी बँकांचे काय नियम आहेत ते समजून घ्या !!!
Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ‘ही’ Electric कार; कुठे होतेय विक्री??