अमेरिकेसह 15 देशांचे तालिबान्यांकडे शांततेचे आवाहन, म्हणाले “बकरी ईदला युद्ध थांबवा”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी 15 देशांनी तालिबानला शांततेचे आवाहन केले आहे. अमेरिकेसह नाटोच्या प्रतिनिधींसह 15 देशांचे राजनायक आणि नाटो प्रतिनिधींनी तालिबान्यांना बकरीद ईदला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील दोहा शांतता चर्चेत युद्धविराम मान्य न झाल्याने अनेक देशांच्या राजनायकांद्वारे हे आवाहन करण्यात आले आहे.

अफगाण नेत्यांच्या शिष्टमंडळाने आठवड्याच्या शेवटी कतारच्या राजधानीत तालिबान्यांची भेट घेतली पण रविवारी तालिबान्यांनी जारी केलेल्या निवेदनात युद्धबंदीचा काहीही उल्लेख केलेला नाही. यानंतर परदेशी मिशनने याबाबत चिंता व्यक्त केली असून तालिबान्यांना युद्धबंदीचे आवाहन केले.

नाटो आणि 15 राजनयिक मोहिमेच्या प्रतिनिधींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बकरी ईदच्या निमित्ताने तालिबान्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवावीत. तालिबान्यांनी जगाला हे सांगावे की, ते शांतता प्रक्रियेचा आदर करतात आणि त्यासाठी वचनबद्ध आहोत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी तालिबानला हे आवाहन केले आहे. ईदच्या निमित्ताने तालिबानने युद्धबंदी जाहीर करावी आणि अफगाण नागरिकांनी हा उत्सव शांततेत साजरा करावा अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.

खरं तर, अमेरिकेच्या नेतृत्वात सैन्याने 20 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर अफगाणिस्तान सोडले आहे आणि या संधीचा फायदा घेत तालिबान बहुतांश भाग आपल्या ताब्यात घेण्यात व्यस्त आहे. या व्यतिरिक्त, शाळा बंद करणे आणि राजनायक मिशनद्वारे मीडिया संस्थाची कार्यालये ताब्यात घेण्याचा निषेधही केला आहे. तथापि, तालिबान्यांनी अशी कोणतीही कारवाई केली असल्याचे नाकारले आहे. नुकतेच भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूमध्ये आपला सहभाग असल्याचेही त्यांनी नाकारले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment