हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण परदेशात जाण्याचे प्लॅनिंग करत असाल आणि आपल्याकडे Passport नसेल तर आता त्यासाठी चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण पोस्ट ऑफिसकडून याबाबत आपल्यासाठी एक खास सुविधा सुरू केली गेली आहे, ज्याद्वारे आपल्याला अगदी सहजपणे पासपोर्ट बनवता येईल. होय, आता आपल्याला पोस्ट ऑफिसमधूनही पासपोर्टसाठी अर्ज करता येऊ शकेल. मात्र त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSS) काउंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करून अर्ज करावा लागेल.
पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार http://Passportindia.gov.in“पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे Passport कार्यालयाच्या शाखा विस्तारित आहेत आणि पासपोर्ट देण्याशी संबंधित फ्रंट-एंड सर्व्हिस देतात. या केंद्रांमध्ये टोकन जारी करण्यापासून ते पासपोर्ट देण्यासाठी अर्ज करण्यापर्यंतची कार्यक्षमता समाविष्ट आहे.
ऑनलाईन अर्जानंतर काय करावे ???
ज्या लोकांनी Passport साठी रजिस्ट्रेशन करून अर्ज केले आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रावर अर्ज प्रिंट रिसीट आणि मूळ कागदपत्रांसह हजेरी लावावी लागेल. त्याशिवाय ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून Passport साठी अर्ज केला आहे ते जवळच्या पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रावर अर्जाची प्रिंट रिसीट आणि मूळ कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ???
Passport मिळविण्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, दहावीचे मार्कशीट, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्डसह तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!
Business Idea : कमी गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून मिळवा हजारो रुपये !!!
जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!
Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी !!! MCLR वाढल्याने कर्ज महागले