प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

औरंगाबाद – शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना आता आपल्या समस्यांबाबत तक्रार मांडण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. आता नागरिकांना जवळच्याच प्रभाग कार्यालयात जाऊन आपल्या समस्यांबाबत माहिती देता येईल. एवढेच नव्हे तर या समस्यांवर तत्काळ उपाययोजनादेखील केली जाईल, अशी योजना औरंगाबाद माहापालिकेतर्फे आखण्यात आली आहे.

औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हे संबंधित प्रभागाचे पालक अधिकारी असतील. पांडेय यांनी महापालिकेतील 9 प्रभागासाठी 9 पालक अधिकाऱ्यांची (संनियंत्रण अधिकारी) नियुक्ती केली आहे. यासंबंधीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत.

शहरातील अधिकारी पुढीलप्रमाणे-
प्रभाग 1 ए. बी. देशमुख
प्रभाग 2 विजय पाटील, उद्यान अधीक्षक
प्रभाग 3 सौरभ जोशी, उपायुक्त
प्रभाग 4 संतोष टेंगळे, उपायुक्त
प्रभाग 5 डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी
प्रभाग 6 अ‍ॅड. अपर्णा थेटे, उपायुक्त
प्रभाग 7 एस.डी. काकडे, कार्यकारी अभियंता
प्रभाग 8 बी.डी. फड, कार्यकारी अभियंता
प्रभाग 9 संजय पवार, लेखाधिकारी

You might also like