बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक दरोड्याची (robbery) घटना घडली आहे. यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 8 ते 10 दरोडेखोरांनी 9 लाखांची रोख रक्कम आणि पाच तोळे सोने पळवून नेले आहे. या दरोडेखोरांनी चोरी करताना दाम्पत्यास बेदम मारहाणसुद्धा केली आहे. या भयानक आणि धाडसी चोरीच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

काय घडले नेमके?
बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकलाय. यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचं कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला बेदम मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे.

या घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांसह एलसीबीच्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दरोड्याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!