नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा आरोपींनी एका बँकेवर दरोडा (robbery) टाकला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा होती, अशी माहिती समोर आली आहे. हि संपूर्ण घटना बँकेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी आरोपी बँकेत शिरतात आणि नंतर मॅनबंद धारदार तलवार बाहेर (robbery) काढतात. यावेळी ते कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात.
नांदेडमध्ये भरदिवसा आरोपींनी घातला सशस्त्र दरोडा, Video आला समोर pic.twitter.com/j7eZ55zfdj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 1, 2022
काय घडले नेमके?
नांदेडमध्ये आज भर दिवसा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने व्यंकटराव पाटील कवळे बँकेवर सशस्त्र दरोडा (robbery) टाकला. हा दरोड्याची घटना उमरी तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सिंधी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये पाच ते सहा जण दुपारच्यावेळी हातात तलवारी घेऊन बँकेत आले. त्यांनी धारदार तलवारी मॅनमधून काढत कर्मचाऱ्यांना दमदाटी केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी दोन लाख रुपये बँकेतून पळ काढला.
काँग्रेसचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांची ही बँक आहे. बँकेवर दरोडा (robbery) पडल्याची बातमी गावकऱ्यांना समजताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. यावेळी त्यांना एक दरोडेखोर सापडला. त्याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय