हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सकाळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न एका दूरचित्रवाहिनीला लाईव्ह इंटरव्यू देत होत्या. हा इंटरव्यू सुरु असताना तिथे अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. मात्र , तरीही त्यांनी आपला इंटरव्यू पुढे सुरूच ठेवला. राजधानी वेलिंग्टनमधील संसद कॉम्प्लेक्समध्ये काय चालले आहे याची माहिती देण्यासाठी आर्डर्न यांनी मुलाखतकार रायन ब्रिजला अडवले. आर्डर्न म्हणाल्या, “रायन येथे भूकंप आला आहे आणि आत्ताच आपल्याला एक मोठा धक्का जाणवला आहे.” त्यानंतर खोलीत उजवीकडे-डावीकडे पाहत आर्डर्न म्हणाल्या, “आपण माझ्या मागे हालत असलेल्या वस्तू पाहू शकता.”
न्यूझीलंड हा देश पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येतो आणि येथे वारंवार येणाऱ्या भूकंपांमुळे ते एक अस्थिर बेट म्हणूनही ओळखले जाते. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार सोमवारी सकाळी आलेल्या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू हा ईशान्य वेलिंग्टनपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर समुद्राच्या खोलीवर होता. मात्र,यामुळे जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. आर्डर्न यांनी आपली मुलाखत सुरू ठेवली आणि मुलाखतकाराला सांगितले की,’ भूकंप आता कमी झाला आहे.’ यावर तो म्हणाला, “मी ठीक आहे रायन. माझ्या डोक्यावर असलेल्या दिव्यांची आता हालचाल थांबली आहे, मला वाटते की, मी आता एका भक्कम ढाच्याखाली बसलेली आहे. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.