पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण | अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

नक्की काय आहे आत्महत्या प्रकरण –

परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. पूजा चव्हाण आणि एका मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like