हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी तयार केलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले तर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी दिले जाईल. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना व समर्थकांनाही आवाहन केले. या निवडणुकीत आपला पाठींबा दिल्यास आपण पाणी आणि वीज या मोफत देण्याची घोषणा प्रत्यक्षात उतरवू असे केजरीवाल यांनी म्हंटले.
गोवा में बीजेपी-कांग्रेस समर्थकों के लिए मेरा एक ज़रूरी संदेश। Press Conference | LIVE https://t.co/dNsdMtdBtA
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 3, 2022
यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की,काँग्रेसने पंचवीस वर्ष सत्ता उपभोगली. एखाद्या पक्षासाठी पंचवीस वर्षे खूप आहेत विकास करण्यासाठी. मात्र, काँग्रेसने पंचवीस वर्षात काहीही केले नाही. आम्ही गोव्याच्या निवडणुकीत अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आलो आहोत. जर आमचा पक्ष यावेळी गोव्यात सत्तेवर आला तर पाच वर्षांत प्रत्येकाला किमान दहा लाखांचा फायदा करुन दिला जाईल, असेही केजरीवाल यांनी म्हंटले.