आता ‘हा’ मोबाईल क्रमांक ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे देशातील पंजाबसह काही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एक नवीन कल्पना लढवली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 7074870748 हा एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे लागणार आहे. ते नाव सांगितल्यास ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे.

आम आदमी पार्टी प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहार. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंजाबमध्ये यावेळेस निवडणुकीत आणेकी नवीन कल्पना लढवणार असल्याचे सांगितले. पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काही पावलंच दूर आहोत. फक्त दोन-तीन जागांचाच प्रश्न आहे. सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान करा असे आवाहनही केजरीवाल यांनी केले आहे.

अनेक पक्ष आपापल्या कुटुंबियांना, मुलाला, नातेवाईकाला मुख्यमंत्री बनवतात. पंजाबमध्ये बंद खोलीत सीएमचा चेहरा ठरवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. आपण थेट लोकांनाच विचारणार आहोत कि त्यांना त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांपैकी कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचे, हे ठरवता येईल. त्यासाठी एक फोन नंबर दिला आहे. त्यावर फोन करून लोकांनी त्यांना कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव हे सांगायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले