हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या 16 तारखेला आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजेवर टीका केली आहे. कुणी तरी काढा दिल्याने तुमचा आवाज विरोधात दिसत आहे असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
अरविंद सावंत म्हणाले, छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं पाहिजे, असं देखील सावंत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.