हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |मुंबई येथील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याची कसून एनसीबी कडून चौकशी करण्यात येत असून आर्यन गेल्या 4 वर्षांपासून ड्रगचे सेवन करत असल्याची माहिती मिळत आहे. शाहरुख खान आणि आर्यन यांचे फोनवर बोलणे देखील झाले आहे. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या लँडलाइन फोनवरून आर्यनला 2 मिनिटे आपले वडिल शाहरुख खानशी बोलू दिले.
एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.
NCB च्या तपासात असे निदर्शनास आले आहे की आर्यन सुमारे 4 वर्षांपासून ड्रग्सचा वापर करत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने वरिष्ठ वकील सतीश मानशिंदे यांना आर्यनचे वकील म्हणून निवडले आहे. सतीश मानशिंदे अनेक बॉलीवूड सेलेब्सचे वकील आहेत.