लिंबूवाले अंधश्रद्धाळू सरकार एक्सा नागरी कायदा काय आणणार- असदुद्दिन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ‘ एक्सा सीव्हील कोड’ आणायचं म्हणत आहेत. एकीकडे फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानासमोर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लिंबू ठेवत असतील तर हे सरकार एक्सा सिव्हील कोड कसं आणणार असा सवाल एमआयएम पक्षप्रमुख खासदार असऊद्दीन ओवेसी यांनी केला आहे. शिवसेनेच्या बोटचेप्या भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली.

सेना-भाजपच्या नेत्यांना तरुणांनी रोजगार किंवा इतर गोष्टींवर प्रश्न विचारले असता त्यांना काश्मीरमधील 370 कलम, पाकिस्तानला धडा शिकवल्याचे सांगितले जाते. मोहन भागवत यांनीही मॉब लिचींगबद्दल केलेले विधान चुकीचे आहे असं सांगत पंजाबमध्ये झालेल्या शिखांच्या हत्या, 2002मध्ये गुजरातमध्ये झालेल्या घटना मॉब लिंचींग नव्हत्या का ? असा प्रतिप्रश्न भागवतांना ओवेसी यांनी केला. मुस्लिमांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. काही लोक काँग्रेस व राष्ट्रवादीची गुलामी करण्यातच धन्यता मानत आहेत असंही पुढे ते म्हणाले. परभणी विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान यांच्या प्रचारार्थ बुधवारी दर्गा रोड येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी खा. इम्तियाज जलील, माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, रशीद इंजिनिअर, एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान, शहराध्यक्ष शेख अखील, नगरसेवक सय्यद माजीद, नगरसेवक जाकेरलाला, रफीयोद्दीन अशरफी आदी उपस्थित होते.

दुष्काळामुळे महाराष्ट्रात जवळपास १४५०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदीनंतर अनेक छोटेमोठे व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका दौरा करून ट्रम्प यांना भेटण्यात धन्यता मानतात. पंतप्रधान मोदींना अमेरीका दौर्‍यातून काय मिळाले ? असा सवाल करीत भाजपा व शिवसेना सरकार विकासाच्या सर्वच आघाड्यांवर नापास झाले असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी केला.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment