व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मुक्त करणं हाच तुमचा अमृत महोत्सव का?; ओवेसींचा पंतप्रधान मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांकडून चांगलीच टीका केली जाऊ लागली आहे. अशात बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची सुटका सरकारने केली असल्याने यावरून ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘गंभीर गुन्ह्यातील आरोपींना असं मुक्त करणं हाच तुमचा अमृत महोत्सव आहे का? असा सवाल उपस्थित करत ओवेसी यांनी महिला सन्मानाच्या वेळी भाजपाला मुस्लीम महिलांचा विसर पडतो,’ असा आरोप भाजपवर केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारला लक्ष केले. ते म्हणाले की, ‘बिल्किस बानो प्रकणातील 11 आरोपींना भाजप सरकारने मुक्त केले आहे. हे तेच 11 लोक आहेत, ज्यांनी 5 महिन्याच्या गर्भवती असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार केले होते. तिच्या 3 वर्षाच्या मुलीची तसेच तिच्या कुटुंबियांचीही हत्या केली होती. हाच पंतप्रधान मोदी यांचा अमृत महोत्सव आहे का?”, असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे.

आरोपींची सुटका करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, अशी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सोडणे योग्य नाही. आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सन्मानाबाबत आणि सुरक्षिततेबाबत बोलतात आणि दुसरीकडे अशा प्रकारे आरोपींना सोडण्यात येते. यावरून दिसून येते की, भाजपा केवळ महिला सुरक्षेच्या गोष्टी करत. पण जेव्हा मुस्लीम महिलांचा विषय येतो. तेव्हा त्यांना महिला सन्मानाचा विसर पडतो, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.