नवी दिल्ली । 8 डिसेंबरपासून Ashes Series सुरू होणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे इंग्लंडच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेण्याविषयी म्हंटले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ECB) येत्या आठवड्यात या मालिकेबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. कोरोना नंतर गेल्या वर्षी जुलै मध्ये क्रिकेट परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ घरा बाहेर एकही कसोटी खेळलेला नाही. त्याचबरोबर इंग्लंडने परदेशात 6 कसोटी खेळल्या आहेत. म्हणजेच, कोरोनाने ऑस्ट्रेलियन संघाला एक प्रकारे घाबरवले आहे.
8 जुलै 2020 रोजी कोरोना नंतर पुन्हा क्रिकेटचे पुनरागमन झाले. मात्र आता मालिका बायो बबलमध्ये खेळवल्या जात आहेत. मात्र, यामुळे खेळाडूंना खूप त्रास होत आहे. कसोटीबद्दल बोलायचे झाले तर या काळात इंग्लंडने सर्वांत जास्त 18 कसोटी खेळल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 4 कसोटी खेळला आहे. म्हणजेच, त्यांच्या खेळाडूंना या काळात बायो बबलमध्ये कमी काढावे लागले. एकूण 11 संघांनी किमान एक तरी कसोटी सामना खेळला आहे.
टीम इंडियाही मागे नाही
यादरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज प्रत्येकी 13 कसोटी खेळले आहेत. याशिवाय पाकिस्तान 11, श्रीलंका 8, न्यूझीलंड 7, दक्षिण आफ्रिका 6, बांगलादेश-झिम्बाब्वे 5-5 तर अफगाणिस्तान 2 कसोटी खेळला. घराबाहेर कसोटी खेळणे आणखी अवघड आहे, कारण संघाला यजमान देशात जाऊन 7 ते 10 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. या कालावधीत पाकिस्तानने घराबाहेर जास्तीत जास्त 9 कसोटी खेळल्या आहेत. भारताने 8 आणि वेस्ट इंडिजने 7 कसोटी परदेशी भूमीवर खेळल्या.
चर्चेनंतर निवडीबाबत निर्णय घेतला जाईल
इंग्लंडला ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 5 कसोटी खेळायच्या आहेत. ECB ने सांगितले की, Ashes Series च्या आयोजनासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत नियमित आणि सकारात्मक चर्चा होत आहे, ज्यामध्ये सर्वांच्या आरोग्याला आणि हितांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. ECB ने म्हटले, ‘आम्ही या आठवड्यात आमच्या खेळाडूंशी बोलणे सुरू ठेवू आणि त्यांना नवीन माहिती देऊन त्यांच्या प्रतिक्रिया कळवू.’ ते म्हणाले की,”पुढे जायचे की नाही हे ठरवण्यासाठी ECB बोर्ड या आठवड्याच्या शेवटी बैठक घेईल. यासह, आम्ही या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी संघ निवडीचा निर्णय घेऊ.”