चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लडाखच्या पार्श्वभूमीवर सैन्याला दिले युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करत चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. आणि तशीच वेळ आली तर आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे ठामपणे रक्षण करण्यासही सांगितले. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) चे सरचिटणीस आणि सुमारे २ दशलक्ष सैन्य असलेलय चीनचे सेनाप्रमुख असलेले ६६ वर्षीय शी जिनपिंग यांनी सैन्याला ही सूचना केली आहे. येथे चालू असलेल्या संसदीय अधिवेशनात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स सशस्त्र पोलिस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी भासहग घेतला आणि यावर भाष्य केले.

अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी जिनपिंग यांनी सैन्याने सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करण्याची, त्याबद्दल विचार करण्याची तयारी ठेवावी. तसेच युद्धासाठी तयारी वाढवण्याच्या दृष्टीने सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी, राष्ट्रीय सार्वभौमत्व,सुरक्षा तसेच विकासाचे हित याचे रक्षण करण्यासही त्यांनी आपल्या सैन्याला सांगितले.

भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास गेले २० दिवस चाललेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. अलिकडच्या काळात, लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये भारत आणि चीनने आपल्या सैन्याची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान गेल्या दोन आठवड्यात दोनदा तणाव निर्माण झाला होता. सुमारे ३,५०० कि.मी.असलेली ही एलएसी दोन्ही देशांमधील सीमा म्हणून काम करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment