हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौदी अरेबियाने मक्का आणि मदिना येथे २४ तासांचा कर्फ्यू लावला आहे. प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. समाचार एजेंसी सिन्हुआने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, “प्रवेश आणि बाहेर जाण्यासंबंधीचे निर्बंध कायम ठेवून दोन्ही शहरांच्या सर्व भागात कर्फ्यू लागू होईल.” प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या निर्बंधामध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी समाविष्ट नाहीत.
दररोज सकाळी ६ ते संध्याकाळी३ या कालावधीत दोन शहरांमधील रहिवाशांना फक्त औषध संबंधित आणि अन्नाशी संबंधित अशा गरजा भागविण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते गुरुवारीपर्यंत साथीच्या आजाराची लागण होणारी संख्या १,८८५ पर्यंत वाढली आहे आणि २१ लोकांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी हजमंत्र्यांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या अनिश्चिततेमुळे मुस्लिमांना यावेळी हजची तयारी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. या महिन्याच्या सुरूवातीला सौदी अरेबियाने त्याच्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याच्या भीतीने उमराह यात्रेला स्थगिती दिली. हे अभूतपूर्व पाऊल असल्याने, वार्षिक हजकडे देखील अनिश्चिततेसह पाहिले गेले.
सौदी अरेबियाचे हजमंत्री मोहम्मद बिन्तायेने मंगळवारी सरकारद्वारे संचालित अल-एखबेरिया टेलिव्हिजनला सांगितले की, “हज आणि उमराहात रस असणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी सौदी अरेबिया पूर्णपणे तयार आहे, पण सद्य परिस्थितीत सौदी अरेबिया या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर आहे. मुस्लिम आणि आपल्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. म्हणून आम्ही सर्व देशातील मुस्लिम बांधवांना सांगितले आहे की परिस्थिती योग्य होईपर्यंत त्यांनी हजची प्रतीक्षा करावी. ”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता