हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या क्रॅश एअरक्राफ्टच्या पायलटने विमान लँडिंग करण्यापूर्वी विमानाचा वेग आणि उंची याबद्दल हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिलेल्या तीन इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी मिळालेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. नॅशनल एव्हिएशन कंपनीचे विमान पीके-८३००३ शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात ९७ लोकं ठार तर दोन लोक हे अगदी चमत्कारीकरित्या बचावले आहेत. हा अपघात देशाच्या इतिहासातील सर्वात दुःखद अपघात ठरला आहे.
जियो न्यूजने एटीसीच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की,’ लाहोरहून कराचीकडे येणारे एअरबस ए -३२० विमान जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जमिनीपासून ७,००० फूटांऐवजी १०,००० फूट उंचीवर १५ नॉटिकल मैलांवर उड्डाण करीत होते. तेव्हा एटीसीने पायलटला विमानाची उंची कमी करण्याचा पहिला इशारा दिला. त्यात पायलटने खाली येण्याऐवजी आपण आहे तिथेच समाधानी असल्याचे सांगितले. जेव्हा विमान विमानतळापासून अवघ्या १० नॉटिकल मैलांवर होते तेव्हा विमान ३,००० फूटांऐवजी ७,००० फूट उंचीवर होते.
एटीसीने विमानाची उंची कमी करण्यासाठी पायलटला दुसरा इशारा दिला. मात्र, पायलटने पुन्हा सांगितले की, या उंचीविषयी तो समाधानी आहे तसेच परिस्थिती हाताळेल आणि तो विमान खाली उतरवण्यास तयार आहे. अहवालात असे सांगितले गेले आहे की,’ या विमानाला दोन तास ३४ मिनिटांपर्यंत उड्डाण करण्यासाठी पुरेसे इंधन होते, तर विमानाची एकूण वेळ एक तास ३३ मिनिटांवर नोंदविण्यात आली.
हा अपघात पायलटच्या चुकीमुळे कि तांत्रिक अडचणींमुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अधिकारी करीत आहेत. देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने (सीएए) तयार केलेल्या अहवालानुसार, विमान उतरवण्याच्या पायलटच्या पहिल्या प्रयत्नात विमानाच्या इंजिनने धावपट्टीवर तीन वेळा जोरदार धडक दिली त्यावेळी तज्ज्ञांना तिथून आगीच्या ठिणग्या उडलेल्या दिसल्या. अहवालात असे नमूद केले आहे की,’ विमान लँडिंग करण्याच्या पहिल्या अपयशी प्रयत्नात जेव्हा विमानाने जमिनीवर धडक दिली तेव्हा इंजिनच्या तेलाचा टँक आणि इंधन पंप खराब झाले असेल आणि मग त्यातून इंधन गळती झाली असावी, ज्यामुळे विमानास सुरक्षित पातळीवर उचलण्यासाठी आवश्यक असणारी ताकद आणि वेग मिळाला नसेल. त्यात असेही म्हटले आहे की जेव्हा विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा वैमानिकाने स्वतःहूनच पुन्हा एक चक्कर मारण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी एटीसीला लँडिंग गीअर कार्यरत नसल्याची माहिती मिळाली.
अहवालानुसार, “एअर ट्रॅफिक कंट्रोलरने पायलटला विमानास ३,००० फूट उंचीवर नेण्याची सूचना केली, परंतु तो केवळ १,८०० फूटांपर्यंतच नेऊ शकला. जेव्हा कॉकपिटला ३,००० फूटांवर हलविण्याची आठवण केली तेव्हा पहिला अधिकारी म्हणाला, “आम्ही प्रयत्न करीत आहोत.” डॉन वृत्तपत्राने असे वृत्त देत म्हटले की,’ वैमानिकाने यानंतर लवकरच दोन इंजिन काम करत नसल्याची बातमी दिली. आणि तो त्याचे क्रॅश लँडिंग करणार असल्याचे सांगितले. उपलब्ध असलेल्या दोन धावपट्ट्यांपैकी एकावर उतरण्यासाठी नियंत्रकाने पीआयए विमानास मंजुरी दिली होती, परंतु पायलटकडून तसे करण्यास धोका असल्याचे सूचित केले जात होते. तज्ञांच्या मते, विमान योग्य त्या उंचीवर न पोहोचणे हे इंजिन कार्यरत नसल्याचे दर्शवते. त्यानंतर विमान एका बाजूला झुकले आणि अचानक कोसळले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.