नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. चीनमधील हांगझोऊ शहरात सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian Games 2022) चे आयोजन करण्यात येणार होते. मात्र आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.याच पार्श्वभूमीवर आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian Games 2022) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया ऑलिम्पिक कौन्सिलचे कार्यवाहक अध्यक्ष रणधीर सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
चीन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, आशिया ऑलिम्पिक कॉन्सिलने शुक्रवारी सांगितले की, 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. पण चीनमध्ये कोविड-19 शी संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत असल्यामुळे हि घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील असे देखील सांगण्यात आले.
आशियाई क्रीडा स्पर्धाचे आयोजन शांघायजवळील चीनच्या हांगझोऊ या शहराने केले होते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अलीकडेच चीनमधील सर्वात मोठे शहर शांघाय येथेही आठवडाभराचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2022) आयोजकांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, चीनच्या पूर्वेकडील 12 दशलक्ष लोकसंख्येचे शहर हंगझोऊने आशियाई खेळ आणि आशियाई पॅरा-गेम्ससाठी सुमारे 56 स्पर्धा स्थळांचे बांधकाम पूर्ण केले आहे. 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत या स्पर्धा होणार होत्या. या आशियाई क्रीडा स्पर्धेत 11 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार होते.
हे पण वाचा :
अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे
सपना चौधरीने घराच्या छतावर आपल्या पतीसोबत केला रोमान्स
एका केळाचे अनेक गुणकारी उपाय : ‘या’ वेळी खाल्यास लांब राहतील सर्व आजार
Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी